ठेकेदाराची पोलिस ठाण्यात तक्रार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
नगर – गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या पाणी योजनेच्या विहिरीवरील पावर हाऊस मधून नवीन ७.५ एच पी. क्षमतेचा वीज पंप व केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील मांडवे गावात घडली आहे. याबाबत पाणी योजनेचे काम करणारे ठेकेदार केशव नारायण दरेकर (रा. निर्मल नगर, सावेडी) यांनी गुरुवारी (दि.२०) रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मांडवे गावाला पाणी पुरवठा करणार्या योजनेचे काम केशव दरेकर हे करत आहेत. या पाणी योजनेसाठी विहिरीवर नवी वीज पंप बसविण्यासाठी त्यांनी हा ७.५ एच पी. क्षमतेचा नवा वीज पंप आणला होता. तो विहिरी जवळील पावर हाऊस च्या खोलीत ठेवलेला होता. अज्ञात चोरट्याने दि.८ जून रोजी सायंकाळी ७ ते ९ जून रोजी सकाळी ९ या कालावधीत पावर हाऊस च्या खोलीच्या दरवाजाची कडी उघडून आत ठेवलेला नवीन वीज पंप व त्याची केबल असा ३० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.