प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा : सुधाकर बोराळे

0
32

नगर- पंतप्रधान पिक विमा ही केंद्र शासनाची शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी व आर्थिक उत्पन्नवाढी साठीची महत्त्वकांक्षी योजना असून प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२४ अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात खरीप पिकांचा विमा हीींिीं://ुुु.ळिाषलू.र्सेीं.ळप या ऑनलाईन पोर्टलवर भरणे सुरू झालेले आहे.तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. खरीप पिकांचा विमा ऑनलाईन पोर्टलवर भरण्यासाठी १५ जुलै ही अंतिम दिनांक आहे. या अंतिम दिनांक पूर्वी सर्व शेतकरी बांधवांनी पिक विमा ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच ऑनलाईन पोर्टलवर पिक विमा भरण्यासाठी एक रुपयात पिक विम्याची सुविधा उपलब्ध आहे.

केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना : सुधाकर बोराळे

कर्जदार शेतकरी हे संबंधित वित्तीय संस्थेतून विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. तसेच बिगर कर्जदार शेतकरी सीएससी केंद्र, ग्रामीण बँक, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तसेच विमा योजनेच्या संकेत स्थळावरून (https://www.pmfby.gov.in) सहभागी होऊ शकतात. खरीप २०२४ मध्ये सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी व्हावे व योजनेचा लाभ घ्यावा. घेऊन येणार्‍या अनपेक्षित अडचणी टाळण्यासाठी लवकरात लवकर विमा भरण्याची कार्यवाही करावी असे बोराळे यांनी सांगितले. शेतकर्‍याने १ रुपया विमा हप्ता भरावयाचा असून अहमदनगर जिल्ह्यात खालील १० पिकांचा समावेश करण्यात आला आहे त्यांची प्रती हेटरी विमा संरक्षण रक्कम रु. खालील प्रमाणे आहे. पिकाचे नाव- भात -५१७६०/, बाजरी -३३९१३/, भुईमूग -३८०००/-, सोयाबीन -५७२६७ /-, मुग -२००००/-, तुर ३६८०२ /-, उडीद- २०००, कापूस-५९९८३/-, मका-३५५९८/-, कांदा-८००००/-