नगर – इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाइन अॅण्ड टेनॉलॉजी(आय.एस.डी.टी.) या संस्थेच्या फॅशन डिझायनिंग व इंटेरियर डिझायनिंग विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे वार्षिक प्रदर्शन स्वानुभव :२०२४ चे आयोजन २२ व २३ जून रोजी स. १० ते सायं.७ या वेळेत करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका पूजा देशमुख यांनी दिली. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांच्याशी संलग्न असलेल्या आय.एस.डी.टी. संस्थेमार्फत प्रतिवर्षी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन २२ जून रोजी सकाळी ९ वाजता दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन आर्किटेट च्या नगर शाखेचे अध्यक्ष आर्किटेट प्रल्हाद जोशी व इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स च्या नगर शाखेचे अध्यक्ष अजय अपूर्वा यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आय.एस.डी.टी. चे संस्थापक अध्यक्ष विनायकराव देशमुख हे भूषविणार आहेत, अशी माहिती आय.एस.डी.टी. चे प्राचार्य आर्किटेट अरुण गावडे यांनी दिली. प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना संचालिका पूजा देशमुख यांनी सांगितले की, सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य खुले असून फॅशन डिझाईन व इंटेरियर डिझाईन या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन विशेष उपयुक्त ठरणार आहे. आय.एस.डी..टी.चे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थी लगेचच अर्थाजन करू शकतात, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.इयत्ता दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षात आपले उज्वल भवितव्य घडविण्याची संधी यानिमित्ताने आय.एस.डी.टी.ने उपलब्ध करून दिली आहे.
या प्रदर्शनात फॅशन डिझाईन विभागात विद्यार्थ्यांनी तयार केलेले लहान मुलांचे फ्रॉस, स्कर्टस, पार्टी वेअर असे कपडे, महिलांसाठी स्कर्टस, शर्ट्स, डिझायनर आऊटफिट्स, हँडमेड ज्वेलरी, हॅन्ड पेंटेड दुपट्टा, जॅकेट्स, सेसरीज यांचे सादरीकरण करण्यात आले असून अत्यंत माफक दरात या कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे इंटेरियर डिझाईन विभागात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या निवासी व व्यावसायिक डिझाइन्सचे व प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य आर्किटेट अरुण गावडे यांनी दिली. आय.एस.डी.टी., निर्मल चेंबर्स मागे, होर्मो केअर लॅब समोर, लाल टाकी, अहमदनगर (०२४१:२४३००२३) येथे आयोजित करण्यात आलेल्या या विनामूल्य प्रदर्शनास विद्यार्थी, पालक, आर्किटेट, इंजिनिअर्स, इंटेरियर डिझायनर्स, कॉन्ट्रॅटर्स व कलारसिक नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आय. एस.डी.टी. या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.