सिद्धीबाग तलावामध्ये जलयोग दिन साजरा

0
81

नगर – २१ जून जागतिक योग दिना निमित्त सिद्धीबाग येथील जलतरण तलावातील सर्व सभासदांनी जलयोग करून जागतिक योग दिन साजरा केला. नियमित योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसे उत्तम राहते या बद्दल जलयोगाचे महत्व पटवून देताना ज्ञानेश्वर सुपेकर म्हणाले की जी योगक्रिया सहजतेने जमिनीवर करता येत नाही ती योग क्रिया पाण्यामध्ये अगदी सहजरीत्या करता येते, जलयोगाने शरीर लवचीक होऊन दबलेल्या नसांमधील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते. नियमित जलयोग केल्याने बर्‍याचश्या लोकांना कमरेच्या, सायटीका सारख्या, तसेच व्हेरिकोज व्हेन्स सारख्या नसांच्या गंभीर आजारापासून सुटका होण्यास मदत मिळते, तसेच नियमित जलयोग केल्याने मानसिक तसेच शारीरिक आरोग्य देखील उत्तम राहून दैनंदिन जीवनात उत्साह आणि ऊर्जा निर्माण करते.

यावेळी सिध्दिबाग जलतरण तलावाचे कुलकर्णी सर, सभासद हरीभाऊ डोळसे, राजेद्र डांगे, अशोककुमार आहुजा, किरण येवलेकर, पै. सचिन बर्डे, अनिल गांधी, महेश कुलकर्णी, सनी प्रज्वल वैद्द, अभिजीत श्रीकांत पाडळकर, राजेेंद्र जोग, राजेंद्र गांधी, श्री. बंग, सांळुके राजन, रमेश चिपाडे, विजय पळशीकर, अमोल भंडारे, महेंद्र दिवाणे, मनिष भंडारे, भळगट सुचीत, राजु मामा जाधव, मेजर सुनिल सुर्यवंशी, लोमटे पंडितराव, सुनिल मोरे, अ‍ॅड. गिरीश कोळपकर, प्रा. राम गायकवाड, विकास खंडागळे, विजय कुलथे, राजेश डहाळे, मदन पुरोहित उपस्थित होते.