गुलमोहर रस्त्याचे अपूर्ण असलेले डांबरीकरण पूर्ण करून पथदिवे लावा

0
22

मनसेचे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेऊन दिले स्मरणपत्र 

नगर – सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्याची वर्क ऑर्डर साधारणत: मार्च २०२१ मध्ये निघाली त्यानंतर तब्बल एक वर्षांनी रस्त्याचा एक लेयर पूर्ण झाला. परंतु आजतागायत तब्बल दोन वर्षे होऊन देखील रस्त्याचे अंतिम लेयरचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ज्या एक लेयरचे काम पूर्ण झाले आहे तोही पूर्णतः खराब होत आला आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकार्‍यांना विचारणा केली असता त्याच कडून महापालिकेकडे ठेकेदारास पुढील कामासाठी देण्यास पैसे नाहीत असे उत्तर मिळते. मग महानगरपालिकेने त्या प्रस्तावित रस्त्याचे टेंडरच का काढले असा प्रश्न निर्माण होतो. ज्या परिसरातून महानगरपालिकेला सर्वात जास्त टॅस मिळतो त्यांच्याच मूलभूत गरजांसाठी प्रशासनाकडे पैसे नाही ही खेददायक बाब आहे. या बाबत मनसे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेऊन पुन्हा एकदा समरण पत्र सादर केले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत, शहर सचिव संतोष साळवे, महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अनिता दिघे, वाहतूक सेना शहर अध्यक्ष अशोक दातरंगे, सहकार सेना शहर अध्यक्ष गणेश शिंदे, दीपक दांगट, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते गेल्या दोन वर्षापासून गुलमोहर रस्त्यावरील सुस्थितीत असलेले पथदिवे काढून ठेवल्यामुळे सायंकाळच्या वेळी संपूर्ण गुलमोहर रस्त्यावर अंधार असतो, त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.

तसेच चैन स्नॅचींग सारख्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांवर होणार्‍या अन्यायासाठी व त्यांच्या मूलभूत गरजांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी आहे तरी गुलमोहर रस्त्याचे उर्वरित डांबरीकरण कधी पूर्ण होईल? गुलमोहर रस्त्यावरील पथदिवे पूर्ववत कधी लागले जातील? रस्त्याचे डांबरीकरण आणि पथदिवे या दोन्ही कामांसाठी दिरंगाई करणारे अधिकारी असो वा ठेकेदार यांच्यावर कशी आणि केव्हा कारवाई करणार? यासंबंधीचे लेखी उत्तर दोन दिवसात द्यावे. लेखी स्वरूपातील मिळालेल्या उत्तरानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाची दिशा ठरवेल असे तुषार हिरवे यांनी स्पष्ट केले आहे.