नगर – चार चाकी मालवाहू वाहनाच्या दुरुस्तीच्या कामासाठी गॅरेज समोर नगर – सोलापूर महामार्गालगत उभे केलेले असताना रात्रीच्या वेळी या वाहनाच्या डिझेल टाकीतून ११५ लिटर डिझेल व २ एसाईड कंपनीच्या बॅटर्या असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील वाळूंज गावच्या शिवारात मंगळवारी (दि.१८) पहाटे घडली. याबाबत वाहन मालक सचिन चंद्रकांत दांगट (रा. सर्जेपुरा, अहमदनगर) यांनी बुधवारी (दि.१९) रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दांगट यांनी त्याचे मालवाहू वाहन दुरुस्तीच्या कामासाठी वाळूंज गावच्या शिवारात नगर – सोलापूर महामार्गालगत असलेल्या गॅरेज समोर उभे केलेले होते. अज्ञात चोरट्यांनी या वाहनाच्या डिझेल टाकीतून ११५ लिटर डिझेल व २ एसाईड कंपनीच्या बॅटर्या असा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.हे.कॉ.शरद वांढेकर हे करीत आहेत.