क्लासवरून घरी चाललेल्या युवतीला अडवून मोबाईल व कानातील दागिने दोघांनी लुटले

0
38

नगर – लास सुटल्यानंतर मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी चाललेल्या १७ वर्षीय युवतीला पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी रस्त्यात अडवून तिच्या हातातील मोबाईल व कानातील सोन्याच्या रिंगा बळजबरीने काढुन चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.१९) सकाळी १०.३० च्या सुमारास सावेडी उपनगरात असलेल्या कराळे हेल्थ लब समोर घडली. याबाबत समृद्धी कैलास मोकळे (रा. शिवगंगा फेज ३, चिपाडे मळा, सारसनगर) हिने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी समृद्धी ही शिक्षण घेत असून तिने सावेडी उपनगरात लास लावलेले आहेत. बुधवारी (दि.१९) सकाळी १०.३० च्या सुमारास लास संपल्यावर ती सावेडी उपनगरात असलेल्या कराळे हेल्थ लब जवळ राहणार्‍या तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी रस्त्याने जात होती. त्याच वेळी तिच्या पाठीमागून मोटारसायकल वर दोन अनोळखी चोरते आले.

त्यांनी तिला अडवून दमबाजी करत तिच्या हातातील सॅमसंग कंपनीचा गॅलसी ए १३ हा मोबाईल तसेच तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा असा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत ते दोघे मोटारसायकलवर भरधाव वेगात पसार झाले. या घटनेने घाबरलेल्या समृद्धी हिने मैत्रिणीच्या घरी जावून कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांसमवेत तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांच्या विरुध्द भा.दं.वि. कलम ३९२, ३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करत आहेत.