‘महाराज’ चित्रपट प्रदर्शित करु नये

0
23

श्री विसानागर वडनगरा महाजन व श्री मदनमोहनलालजी मंदिर ट्रस्टची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर – यशराज फिल्मचा ‘महाराज’ चित्रपट प्रदर्शित करु नये या मागणीचे निवेदन श्री विसानागर वडनगरा महाजन ट्रस्ट व श्री मदनमोहनलालजी मंदिर ट्रस्ट, नागर गुजराथी वैष्णव समाजच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र नटवरदास गुजराथी, विजय जामगांवकर, राजेंद्र गुजराथी, रविंद्र गांधी, दिनेश गांधी, बन्सीलाल शाह, पंकज गुजराथी, प्रकाश गांधी, दिपक गांधी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देवेंद्र गांधी, नितीन गुजराथी, भरत देवी, कन्हैय्या शाह आदि उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, यशराज फिल्मस् यांचा ‘महाराज’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी आणावी, कारण हा चित्रपट १८६२ च्या इंग्रजांच्या काळात जो लायबल केस होती, त्यावर आधारित आहे. तेव्हा ब्रिटीश साम्राज्य होतं आणि इंग्रज लोकांना कधीच मान्य नव्हतं की सनातन धर्माची शक्ती वाढावी.

इंग्रजांनी एक संस्था तयार केली होती, त्याचे सभासद कर्सनदास मुलजी होते. त्यांनी सत्य प्रकाश नावाच्या पेपरमध्ये अनर्गल गोष्ट सनातन धर्मासाठी आणि संतांसाठी छापली होती आणि त्याचा विरोध करण्यात आला होता. त्या काळात इंग्रज न्यायाधीशांनी पुर्णत: चुकीच्या विचार करुन पुष्टिमार्गीय ग्रंथ आणि भारतीय सनातन धर्माच्या ग्रंथांच्या वास्तविक अर्थाच्या पुर्णत: विपरीत असे चुकीचे अर्थ केले. त्यामधील स्तोत्र आणि मंत्रांच्या सर्वार्थाने चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि त्या चुकीच्या अर्थाने मान्यता दिली हे आपल्या सनातन धर्माला कमी लेखण्याचा/दाखवण्याचे मोठे षडयंत्र होते. पुर्ण विश्व ओळखतो की भारतीय तत्वज्ञान अत्यंत उत्कृष्ट आहे, आदरणीय आहे, उत्तम आणि आत्मवृद्धी देणारा आहे. परंतु त्याची दुवार्ता केल्याने आमच्या मंत्रांची पूर्ण खोटी, अनादरआणि विरोधात्मक व्याख्या केली आणि चुकीच्या आरोपांनी सनातन धर्माला बदनाम केले. अशा २०० वर्षापुर्वी इंग्रजी न्यायाधिशांच्या केलेल्या षडयंत्राच्या आरोपावर आधारित चित्रपट तयार करणे पुर्णत: चुकीचे आहे. इंग्रजांनी तेव्हा आमच्या काही स्वातंत्र्यसैनिकांना न्यायालयाद्वारे आतंकवादी घोषित केले होते. त्याचा वापर ते लोक भारत देशावर दबाव आणण्यासाठी करत होते.

परंतु आजच्या भारतात आम्ही स्वतंत्र आहोत आणि पूर्ण विश्व आमच्या सनातन धर्माची प्रशांसा करतो, अशावेळी फक्त आणि फक्त सनातन धर्माला कमी लेखण्याचा / दाखवण्याचा आणि त्याच्या सोबत पैसे कमवण्याच्या दृष्टीने आमिर खान आणि इतर लोक आणि यशराज चित्रपट संस्था यासारखे लोक कोणताही विचार न करता अहंकाराने धर्मविरोधी चित्रपट तयार करीत आहेत हे स्वतंत्र भारतासाठी अनुचित आहे. अशा प्रकारे कोणत्याही विशेष धर्माला खोटे दाखवणे आणि त्यासह इंग्रजांच्या षडयंत्राच्या काळातील खोट्या षडयंत्रांच्या आधारावर चित्रपट तयार करणे पूर्णपणे आपत्तीजनक आणि चुकीचे आहे. त्यामुळे सर्व सनातन हिंदू समाज त्याचा कठोर विरोध करत असून, आमच्या आचार्य श्री वल्लभ संप्रदाय पुष्टिमार्गीय समाजाकडून या निवेदनाद्वारे जाहीर निषेध करत आहोत, असेही निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक यांनाही देण्यात आले. यावेळी मनोज गुजराथी, मदन गुजराथी, मयुर पारेख, डॉ.श्रीकांत गांधी, सुरेश गांधी, विलास नगरकर, संजय गुजराथी, दर्शन शाह, संजय जामगावकर, प्रकाश गांधी बीवाले, हेमंत नेवासकर, निलेश नेवासकर, गोवर्धनदास छप्पनिया, नितीन शाह, कन्हैय्या छप्पनिया, राहुल सारडा, विपुल शाह, बालकिसन शाह, कु.हर्षा गुजराथी, सौ. सुप्रिया देवी, सौ.भक्ती मेहता आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.