प्रदूषण टाळायचे असेल तर नागरिकांनी देखील सायकलकडे वळावे : आ संग्राम जगताप

0
98

बुरुडगाव येथे जय मातादी ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दीडशे सायकलचे वाटप

नगर – विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी जय मातादी ग्रुपने समाजाला दिशा देणारा उपक्रम हाती घेतला आहे, बुरुडगावातील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्यात आले आहे. त्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या वाड्यावस्त्यावरील घरापासून थेट शाळेपर्यंत पोहोचला जाईल पुढची पिढी घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्या माध्यमातून देश पुढे जाईल शासन दरबारी पाठपुरावा करून विकासाची कामे थेट जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे, सायकल वाटप हा उपक्रम प्रेरणा देणारा असून यासाठी युवकांनी पुढे येऊन समाजाप्रती सामाजिक उपक्रम राबवावे, प्रदूषण टाळायचे असेल तर नागरिकांनी देखील सायकलकडे वळावे, बुरुडगाव मधील युवकांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गावात उभा केला असून त्याचे सुशुभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे, माझे गाव व माझ्या गावातील विद्यार्थी यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी जय मातादी ग्रुपने सायकल वाटपाचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. बुरुडगाव येथील दीडशे शालेय विद्यार्थ्यांना जय मातादी ग्रुपच्या वतीने मोफत सायकलचे वाटप आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जय मातादी ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ वाघ, संकेत कुलट, विशाल पवार, सुभाष कुलट, विलास वाघ, जालिंदर कुलट, राधाकिसन कुलट, किशोर कुलट, रवींद्र ढमढेरे, खंडू काळे, महेश निमसे, दिनेश शेळके, सोमनाथ तांबे, बाळासाहेब जाधव, राहुल दरंदले, महेंद्र हिंगे, मंगेश झिने, दिलीप बोटे, गोरक्षनाथ कराळे, जब्बार शेख, कुंडलिक मोडवे, शनी तांबे, कलीम शेख, दत्ता कर्डिले, अमित जाधव, सचिन पाचारणे, विशाल कांबळे, गणेश मोडवे, नंदू शिंदे, अंकुश कुलट, विकास मोडवे, संजय मोडवे, भाऊ ससाने, उमेश कुलट, हरिभाऊ जाधव, पिनू पाचारणे, राजू फुलारी, राहुल चव्हाण, प्रसाद तांबे, सुभाष कुलट आदी उपस्थित होते. जालिंदर कुलट म्हणाले की, जय मातादी ग्रुपचे संचालक नवनाथ वाघ व संकेत कुलट यांनी सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांचे सायकलचे स्वप्न पूर्ण केले आहे त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद व हास्य पाहून मनाला समाधान झाले आ. संग्राम जगताप यांनी रस्ते, पाणी, लाईट, स्वच्छता, आरोग्य व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी बुरुडगावात काम केले आहे बुरुडगावच्या सामाजिक कामाचा आदर्श नगर शहरातील कार्यकर्त्यांनी घ्यावा व गरजू कुटुंबातील व्यक्तींना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मदत करावी असे ते म्हणाले. प्रास्ताविक मंगेश झिने यांनी केले तर सूत्रसंचालन महेंद्र हिंगे यांनी आणि आभार प्रदर्शन नवनाथ वाघ यांनी मानले.