युवकांनी नोकरी मागे न पळता स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे : अरुण जगताप

0
17

निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या चाँदबीबी महालाच्या पायथ्याशी भेटणार नेप्तीची मटकी भेळचा स्वाद

नगर – निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना नेप्ती ची भेळ ही या ठिकाणी उपलब्ध होणार असून नागरिक निश्चित या भेळचा आनंद घेतील व युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे असल्याची भावना माजी आमदार अरुण जगताप यांनी व्यक्त केली. नगर – पाथर्डी रोड, चाँदबीबी महालाच्या पायथ्याशी नवीन झालेल्या हॉटेल जय भोले येथे नेप्तीची भेळ सेंटरचे शुभारंभ माजी आमदार अरुण जगताप व आ. संग्राम जगताप, अक्षय कर्डिले यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

यावेळी जय भोले उद्योग समूहाचे संचालक सर्पमित्र कृष्णा पाटील बेरड, पै.ऋषिकेश खामकर आदी उपस्थित होते. जय भोले उद्योग समूहाचे संचालक व हॉटेल जय भोले चे मालक सर्पमित्र कृष्णा पाटील बेरड, पै ऋषिकेश खामकर यांना शुभेच्छा देण्यात आले. पाहुण्यांचे बेरड पाटील व खामकर पाटील परिवाराकडून सत्कार करून आभार मानण्यात आले.