मुलांनी लग्न झाले तरी आई-वडिलांना वेगळे समजू नये : खासेराव शितोळे

0
87

ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असेल तर विभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करता येते

नगर – आपली संस्कृती भारतीय संस्कृती आहे मातृदेवो भव पितृ देवो भव ही आपली संस्कृती आहे आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपध्दत होती आणि आता विभक्त कुटुंबपध्दत आहे त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत त्यामुळे वृद्धाश्रमात वृद्धांचे प्रमाण वाढत चालले आहे ही एक शोकांतिका आहे.मुलांनी लग्न झाले तरी आपल्या आईवडिलांना वेगळे समजू नये. ज्येष्ठ नागरिकांना होत असेल तर विभागिय अधिकारी यांचेकडे तक्रार करता येते, असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ अहमदनगर विभागाचे प्रादेशिक अध्यक्ष (फेस्कॉम) नेरुळ, मुंबई माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांनी केले. खासेराव शितोळेसर यांच्या हस्ते श्री नागेश्वर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, थेरगाव (ता. कर्जत) येथे कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रादशिक विभाग अ.नगरचे अध्यक्ष सर्वोत्तम क्षिरसागर, कार्याध्यक्ष के. डी. खानदेशी, अशोक आगरकर, शिवाजीराव ससे, नूर आलम शेख, नांगरे, ऊदारे सरपंच मिनीनाथ शिदें, नागेश्वर संघाचे अध्यक्ष रावसाहेब महानवर, नागेश्वर विद्यालयाचे संस्थापक जोगदंड सर, पै.अशोक सकट आजी माजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ज्येष्ठ नागरिक हजर होते. पुढे बोलताना श्री शितोळे म्हणाले की आई वडील मुलांची अती काळजी करतात आणि घेतात त्यामुळे मुलांनीही आपली काळजी घेतली पाहिजे ही अपेक्षा असते. परंतु सद्य परिस्थिती ही वेगळी आहे. आई-वडिलांनी पण पूर्णपणे मुलांवर अवलंबून राहून मुले मोठी झाल्यावर आपले सर्व काही करतील, या आशेवर राहू नये असे यावेळी ते म्हणाले. यावेळी कार्याध्यक्ष के. डी. खानदेशी यांनी ज्येष्ठ नागरिक संघ स्टेशन परिसराच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव डाडर, शब्बीरभाई पठाण यांनी मोलाचे मार्गदर्शन लाभले.