सेन्सेक्सची ७७,२३५ ३१ वर ओपनिंग तर निफ्टी प्रथमच २३,५७० ८० अंकांच्या पार

0
60
xr:d:DAFyheUoWQ4:6,j:7692555554110656871,t:23102805

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराचा ऐतिहासिक उच्चांक

मुंबई – मोठ्या विकेंडनंतर सुरुवातीलाच शेअर बाजारात ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली आहे. सलग बाजार बंद राहिल्यानंतर मंगळवारी (दि.१८) स्टॉक मार्केटने उंच भरारी घेतली आणि विक्रमी सलामी दिली. सेन्सेसने बाजाराच्या सुरुवातीच्या उच्चांकावर मजल सत्रात सर्वकालीन मारली ७७,२३५.३१ अंकावर ओपनिंग केली तर दुसरीकडे नॅशनल स्टॉक एसचेंजचा एनएसई निफ्टीही प्रथमच २३,५७०.८० अंकांच्या पार पोहोचला. विशेष म्हणजे अर्थसंकल्पापूर्वी पुन्हा एकदा सेन्सेसने ७७,००० अंकांचा आकडा पार करून एक नवीन शिखर सर केले आहे. बाजारच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेस २४२.५४ अंक म्हणजे ०.३४ टक्के वाढीसह ७७,२३५.३१ अंकावर ओपन झाला तर सेन्सेसप्रमाणे एनएसई निफ्टीनेही रॉकेटच्या वेगाने धाव घेतली आणि मार्केटच्या सुरुवातीला १०५.२० अंकांची उडी घेतून २३,५७०.८० अंकांवर सुरुवात केली. याआधी शुक्रवारी एनएसई निर्देशांक २३,४६५ अंकांवर बंद झाला होता.

कोणते शेअर्स तेजीत, कोणाला तोटा

सुरुवातीच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस, सिस बँक आणि विप्रोचे शेअर्सनी सर्वाधिक उडी घेतली तर बीपीसीएल आणि ओएनजीसी या तेल विपणन कंपन्यांच्या समभागांच्या किमती १ टक्के हून अधिक तेजी नोंदवली गेली. दुसरीकडे ऊर्जा (एनर्जी), आयटी आणि एफएमसीजी, इन्फ्रा क्षेत्रात खरेदी होत असताना तर ऑटो क्षेत्रात तुलनेने कमी खरेदी दिसत आहे मात्र, हिरो मोटो कॉर्प या ऑटो सेटरमधील स्टॉकमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत असून बँकिंग क्षेत्रात कमजोरीचा कल दिसत आहे.

मार्केट कॅपिटल उसळले

दरम्यान, बाजारातील तेजीमुळे बीएसईचे बाजार भांडवल सतत नव्या उच्चांकावर पोहोचले आणि ४३७.२२ लाख कोटी रुपये किंवा ५.२३ ट्रिलियन डॉलर्स झाले आहे. सध्या बीएसईमध्ये ३,४१९ शेअर्सची खरेदी विक्री होत असून त्यापैकी २,१०६ शेअर्समध्ये तेजीत तर १,१६८ शेअर्समध्ये घसरण होत असून १४५ शेअर्स कोणताही बदल न होता व्यवहार करत आहेत. याशिवाय, मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील मिडकॅप निर्दे शांकानेही विक्रमी उच्चांक गाठला आणि प्रथमच ५५,४०० अंकांवर पोहोचला.