नगर – परवाना धारक ऑटो रिक्षाना फिटनेस लेट साठी केंद्र सरकार परिवहन विभागाने ५० रुपये रोज दंड आकारणी सुरु केली आहे. तो निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा यासाठी २० जून रोजी ऑटो रिक्षा सह जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली. याबाबत त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीय परिवहन याबाबत त्यात म्हटले आहे का विभागाने ऑटो रिक्षा फिटनेस लेट साठी रोजी ५० रुपये रोज दंड आकारणी सुरु केलेली आहे. ती मागे घ्यावी तसेच महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून कामकाज चालू करावे. ऑटो रिक्षाचे चालू असलेले परवाने तात्काळ बंद करावे. परवाना धारक ऑटो रिक्षासाठी आर.टी.ओ.मध्ये स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यांना आर. टी. ओ. अधिकारी कर्मचार्याने पासिंग व इतर कामासाठी मदत करावी.
दररोज पन्नास रुपये दंड आकारणीचा निर्णय रद्द करण्याची मागणी
अशिक्षित रिक्षा चालकांची आर्थिक लुट थांबवावी व इतर मागण्यांसाठी २० जून रोजी सकाळी ११.०० वाजता रिक्षासह विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा माळीवाडा बस स्थानका जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून माळीवाडा पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड, न्यू आर्टस् कॉलेज, सरकारी दवाखाना, तारकपूर ते डीएसपी चौक पासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निघणार आहे. याची शासनाने नोंद घ्यावी, असे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष विलास कराळे, सरचिटणीस अशेाक औशिकर यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.