नगर – अपार्टमेंटच्या समोरील जागेत लावलेली होंडा कंपनीची युनिकोर्न मोटारसायकल (क्र. एम एच १६ सी पी ९२१०) अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी चोरून नेल्याची घटना पटेल मंगल कार्यालयासमोरील कॅपिटल वन अपार्टमेंट येथे घडली. याबाबत डॉ. बाबासाहेब ठकाजी कडूस यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर चोरीची घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून फिर्यादी डॉ.कडूस यांनी सदर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे.