आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग-आनंद-शांती’ सप्ताहाचे उद्घाटन
नगर – राजयोगा जीवनपध्दती निरोगी जीवनासाठी एक वरदान आहे. सर्वांनी याचा अभ्यास करून आपले जीवन निरोगी-आनंदी व शांतपूर्ण बनविले पाहिजे. संयोजकांनी अशा प्रकाराचा सप्ताह आयोजित करून जनमाणसामधे शांतीची, आनंदाची पेरणी केली जात आहे. मी संयोजकांचे आभार मानतो, असे ब्रह्माकुमारीज परिवारातील सुवालाल शिंगवी यांनी भावना व्यक्त केल्या. येथील रोटरी लब ऑफ अहमदनगर संचलित रोटरी पीस सेंटर व ब्रह्माकुमारीज्चे साईबन में मधुबन गीतापाठशालाद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग-आनंद शांती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन १५ ते २१ जून च्या दरम्यान विविध ठिकाणी राजयोग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ ‘अनामप्रेम’ या संस्थेत सुवालाल शिंगवी यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला.
या प्रसंगी रोटरी परिवारातील समन्वयक नितिन थाडे, मार्गदर्शक व राजयोगाच्या अभ्यासक डॉ. सुधा कांकरिया, अनामप्रेमचे अजीत माने, पत्रकार भुषण देशमुख, डॉ. प्रकाश कांकरिया, रोटरीचे सचिव दिपक गुजराथी, निलेश वैकर, पुरूषोत्तम जाधव, रविंद्र राऊत हे उपस्थित होते, अशी माहिती लबचे अध्यक्ष माधवराव देशमुख यांनी दिली. सुरूवातीला प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नितिने थाडे यांनी सप्ताहाची माहिती सांगुन स्वागत केले. राजयोगाच्या अभ्यासक व या सप्ताहाच्या प्रोजेट चेअरमन डॉ. सुधा कांकरिया यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती सांगुन अनामप्रेम संस्थेतील सर्व अंध-अपंग बांधवाशी प्रेमळ संवाद साधला व त्यांच्याकडून राजयोगा मेडिटेशनचा अभ्यास करून घेतला व ३ महिन्यापासुन वर्षभरासाठी येथील विद्यार्थ्यांसाठी राजयोगाचे कोर्सेस चालू आहेत. भुषण देशमुख म्हणाले की मी स्वत: राजयोगा मेडिटेशनचा कोर्स केला आहे व नुकतेच मला माऊंट अबु येथील मुख्यालयामध्येही योग अभ्यास करण्याची सुवर्णसंधी मिळाली. मला त्याबद्दल समाधान वाटते. आपणही सर्वांनी राजयोगा जीवनपध्दतीचा अवलंब करावा.
अनामप्रेेम मधील राजयोगाचा नियमित अभ्यास करणारी विद्यार्थीनीने राजयोगाबद्दल आपला अनुभव सांगितला. ती म्हणाली की मी नियमित राजयोगा मेडिटेशन करते त्यामुळे मी अंध असल्याची कमीपणाची भावना मला वाटत नाही उलट कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची उभारी मला मिळाली आहे. माझे मन प्रसन्न व एकाग्र झाले आहे. त्यामुळे माझा शालेय अभ्यास उत्तम होतो या वेळेस मला मार्कस् चांगले मिळाले आहेत. सौ. माने यांनी अनामप्रेम मधील विविध दालनाची माहिती सांगितली. अनामप्रेम मधील विष्णू यांनी मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भाषेत कार्यक्रम समजावून सांगितला. १९ जून रोजी सकाळी ९.३० वा स्नेहालय इंग्लिश मिडियम स्कुल, २० जून रोजी सकाळी ७.३० वा रेसिडेन्शिअल हायस्कुल शेवगाव, २१ जून रोजी सकाळी ८ वा अहमदनगर कारागृह, सकाळी १० वा. विसापूर खुले कारागृह, आणि रात्री ८ वा. युटयुबर ऑनलाईन लाईव्ह वैश्विक शांतीसाठी संघटित मेडिटेशन अशा सप्ताहाचे आयोजन केले आहे असे सचिव दिपक गुजराथी यांनी सांगून आभार मानले.