आनंदधाम येथे वाघ्या फाउंडेशनतर्फे मुया प्राण्यांना श्रद्धांजली
नगर – समाजामध्ये आपण सर्वजण वावरत असताना मुया प्राण्यांवर प्रेम करा, श्री भगवान महावीर स्वामी यांनी संदेश देताना सांगितले की जगा आणि जगू द्या, सर्वांना समान अधिकार आहे, प्राण्यांची रक्षा करा मात्र आपल्या देशामध्ये प्राण्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असून नागरिकांमध्ये जनजागृती करावी, वाघ्या फाउंडेशनच्या वतीने मुया प्राण्यांची सेवा केली जात असून नागरिकांमध्ये प्राण्यांविषयी प्रेम, भावना, दया या संदर्भात माहिती दिली जात आहे हे काम कौतुकास्पद आहे, समाजात चांगले काम करणार्यांचे जीवन सार्थक होत असते, सर्वांचा आत्मा एकच असतो, त्यामुळे प्राण्यांची हत्या केल्याने चांगली गोष्ट साध्य होत नाही असे प्रतिपादन कुंदनऋषीजी महाराज यांनी केले देशभर मुया प्राण्यांच्या होत असलेल्या कत्तलीच्या निषेधार्थ आनंदधाम येथे वाघ्या फाउंडेशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कुंदनऋषीजी महाराज, अलोकऋषीजी महाराज, वाघ्या फाउंडेशनचे सुमित वर्मा, मयुरी बनकर, मंगेश पटेकर, हर्षल कटारिया, दर्शना मुजुमदार, ऋषिकेश परदेशी, संदेश सूर्यवंशी, रितेश रणमले, सुरज जपे आदी उपस्थित होते. यावेळी अलोकऋषीजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.