नगर – अखिल भारतीय नाट्यपरिषद अहमदनगर उपनगर शाखेची कार्यकारणी बैठक नुकतीच पार पडली. परिषदेचे अध्यक्ष क्षितिज झावरे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्याच्या कार्यकाळातील लेखाजोखा कार्यकारणीसमोर मांडण्यात आला. तसेच पुढील अध्यक्ष म्हणून प्रसाद बेडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच चैत्राली जावळे यांची प्रमुख कार्यवाहपदी फेर निवड करण्यात आली.
प्रसाद बेडेकर हे गेल्या दोन दशकापेक्षा जास्त काळ नाट्यपरिषदेत तसेच नाट्यक्षेत्रात कार्यरत असून सारडा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या बैठकीला क्षितिज झावरे, चैताली जावळे, संजय लोळगे, सुदर्शन कुलकर्णी, प्रशांत जठार, अभय गोले, पी.डी. कुलकर्णी, विद्या जोशी, जालिंदर शिंदे, गणेश सपकाळ आदी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.