गुन्हे दाखल होतात मात्र तपास लागेना; पोलिसांसमोर चोरांचे मोठे आव्हान
नगर – नगर शहर परिसरातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे सत्र सुरूच असून गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणाहून अनेक मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी शहरातील कोतवाली, तोफखाना पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने या मोटारसायकल चोरांना पकडून या चोर्या रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. शहरातील विविध भागातून या दुचाकी चोरीला जात आहेत. विशेष करून शासकीय कार्यालये, दवाखाने, हॉटेल्स यांच्या पार्किंग मधून दुचाया चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातून, जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारातून गेल्या काही दिवसांत अनेक दुचाया चोरीला गेल्या आहेत. त्यातील एकाही गुन्ह्याचा तपास लागलेला नाही.
माणिकनगर परिसरातून अनेकांच्या दुचाया गेल्या चोरीला
सावेडी उपनगरात नागरिकांच्या रहिवासी इमारतीच्या पार्किंग मधून रात्रीच्या वेळी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्यात वाहन चोरीचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. शहरात कधी कधी एकाच दिवसात ४ ते ५ दुचाया चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे चोर कैद होतात. पण पोलिसांना ते हाती लागत नसल्याने वाहने चोरीला गेलेले नागरिक हतबल झाले आहेत. सध्या दुचाकी वाहनांच्या किंमती मोठ्या प्रमाणात आहेत. कोणतीही वाढलेल्या दुचाकी खरेदी करायला गेले की किमान लाखभर रुपये मोजावे लागतात. अनेक जण फायनान्स कंपन्यांचे कर्ज घेवून वाहने खरेदी करतात पण ते कर्ज फिटायच्या पूर्वीच दुचाकी चोरीला गेल्याने वाहन तर गेले वरून डोयावर कर्ज तसेच राहिले अशी अवस्था नागरिकांची होत आहे.