नगर – नागापूरमधील राजवाडा भागात गोमांस विक्री करणार्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी पकडून त्यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार साबीर मोहम्मदअली शेख यांनी फिर्याद दिली आहे. आदिल आमिम कुरेशी (वय २०), शफिक नूर कुरेशी (वय ५९, दोघे रा. सदर बाजार, भिंगार), वसिम कादीर कुरेशी (वय २८ रा. झेंडीगेट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
नागापूरमधील राजवाडा भागात चक्रधर स्वामी मंदिराच्या मागे काही इसम गोमांस विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी शनिवारी (दि.१५) सायंकाळी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तिघे जण गोमांस विक्री करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून २ हजार ७२० रुपये किमतीचे १६० किलो गोमांस व एक लोखंडी सत्तुर जप्त केला आहे.