शहरातील बेवारस डुकरांवर महापालिका करणार कारवाई

0
40

नगर – मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९, कलम ६६, अ.क्र.२४ व प्रकरण १४ मधील नियम क्र. २२ (३) अन्वये महानगरपालिका हद्दीतील डुकरे प्राणि यांच्यावर प्रतिबंध करणेकामी मालकी शासनाने वापरास प्रतिबंध करणेकामी
मालकी हक्क नसलेली, बेवारस, रहिवासी यांना व रहदारीस अडथळा / उपद्रव करणारी डुकरे पकडणे व जप्त करण्याची
कारवाई करण्यात येणार असुन मालकी हक्क असलेल्या व्यक्ती / संस्था यांनी सदर प्रकरण प्रसिध्द झालेच्या तारखेपासून १० दिवसाच्या मुदतीमध्ये आपलेकडील डुकरे कायम स्वरूपी स्वमालकीच्या जागेत बंदिस्त करावीत तद्नंतर पकडलेली सदर
मोकाट डुकरे कोणत्याही परिस्थितीत परत ताब्यात देण्यात येणार नाही. मोकाट असणारे डुकरे आढळून आल्यास संबंधित मालकावर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहनप्रशासक तथा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी केले आहे.