नगर – अहिल्यानगर येथे वर्षानुवर्षे झेंडीगेट परिसरात अवैध कत्तलखाना हा सर्रासपणे सुरू आहे. येथील सर्व संघटनांनी वेळोवेळी महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय या सर्व कार्यालयात निवेदन दिलेले आहेत. परंतु अद्यापही त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सदर धंदे अहिल्यानगर व परिसरांत मोठ्या प्रमाणात चालू आहेत. अहिल्यानगर भागातील जनता ही प्रचंड धार्मिक स्वभावाची असुन या कत्तलखान्यामूळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. अशा प्रकारामुळे शहरात व जिल्हयात धार्मिक तेढ निर्माण होवु शकते. वर्षानुवर्ष झेंडीगेट परिसरातील अवैध कत्तलखाने व अवैध गोमांस विक्रीची दुकाने कायम स्वरुपी बंद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना नगर जिल्हा गोरक्षक व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व तालुयातील प्रमुख गोरक्षक, हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय अडोळे, विश्व हिंदू परिषदेचे गौतम कराळे, गौसेवा फाउंडेशनचे मयुर राजपुरोहित सिंग, अविनाश सरोदे, मनोज फुलारी, दिनेश हिरगुडे, पंकज नागपुरे, ऋतिक शिंदे, चांगदेव भालसिंग, अनिकेत बांगर, ओंकार गोसावी, वैभव लोखंडे, संकेत माने, हभप आकाश फुले महाराज, वैभव बूधवंत, अमोल बारस्कर, शुभम दरेकर, सागर शेळके, निंबराज बोरुडे आदी उपस्थित होते. शहर हद्दीतील पंचपीर चावडी येथील बागवान गल्लीतील, झेंडीगेटमध्ये अवैध कत्तलखाना, सर्जेपुरा येथील गोमांस विक्री दुकाने, सिध्दार्थनगर येथील गोमांस विक्री दुकान, चक्रधर स्वामी मंदीराच्या मागील गोमांस विक्री दुकान, भिंगार कॅम्प पो.स्टे.हद्दीतील अलमगीर परिसरातील गोमांस विक्री दुकान, भिंगार बाजार येथील सरकारी शौच्यालयाच्या मागे कंजरवाडयाम ध्ये गोमांस विक्री दुकान, भिंगार अर्बन बँकेसमोरील गोमांस विक्रीची दुकान, महिमा हॉस्पीटलच्या मागे गोमांस विक्रीची दुकान, मुकुंदनगर येथे पाच गोमांस विक्रीची दुकाने या सर्व ठिकाणी अवैध कत्तलखाने व गोमांस विक्रीची दुकाने चालू आहेत. तरी सदरील कत्तलखाने व सर्व गोमांस विक्रीची दुकाने कायम स्वरूपी बंद करण्यात यावेत.व गोहत्या बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. अन्यथा अहिल्यानगर मधील सर्व गोरक्षक व गोसेवक १५ जुलै रोजी आमरण उपोषणास बसतील. त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने व जिल्ह्यातील गोरक्षक व गोसेवकांच्या वतीने देण्यात आला आहे.