विजेचा शॉक बसून महिलेचा मृत्यू

0
42

              चंदाबाई दुसुंगे (मयत)

नगर – नागरदेवळे (ता. नगर) शिवारातील आईस्क्रीम फॅटरीत काम करत असताना विजेचा शॉक बसून वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१२) दुपारी घडली आहे. चंदाबाई राजेंद्र दुसुंगे (वय ४५, रा. कापुरवाडी ता. नगर) असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे. नागरदेवळे शिवारातील शेलार मळ्यात आईस्क्रीम फॅटरी आहे. तेथे चंदाबाई दुसुंगे कामाला होत्या.

त्या बुधवारी फॅटरीत काम करत असताना त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉटरांनी घोषीत केले. तशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार पी. ए. बारगजे करत आहेत. मयत चंदाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, सून असा परिवार आहे.