महामार्गावर अर्धवट मोडलेला विद्युत खांब ठरतोयं धोकादायक

0
92

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जीवीत आणि वित्तहानीचाही धोका

नगर – पावसाळ्या पूर्वी महावितरणने विद्युत खांब रोहित्रांना विद्युत तारा, उघडया डिपी यांना अडथळा ठरणार्‍या झाडांच्या फांद्या, लोंबकळत असणार्‍या तारा दुरुस्ती करावयास हव्यात जेणे करून कुठल्याही प्रकारच्या जीवीतहानी वित्तहानी होता कामा नये अशा प्रकाराचे आदेश दरवर्षी आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात येतात परंतू गेंड्याची कातडी ओढलल्या महावितरणचे अधिकारी सोंग घेऊन झोपी जातात अशी नेहमीच सार्वत्रिक चर्चा होत असते वसूलीला प्रथम आणि सर्वसामान्य माणसाला कामासाठी हेलपाटे मारायला लावणारे कोठे काही वित्तहानी, जीवीतहानी झालीच तर ठेकदार किंवा सर्वसामानांच्या माथी मारून स्वतः धुतल्या तांदळा सारखे फिरतात. या सर्व गोष्टींचा त्यांना काहीच फरक पडत नाही.

सोशल मिडियावर सामाजिक कार्यकार्ये कर्त्यांनी, वृत्तपत्रामध्ये बातम्या छापून आल्यानंतर त्यांची पळापळ म्हणजे वराती मागून घोड अशीच अवस्था दिसते. लाईट वाचून अख्ख शहर वेठीस धरले जाते. मग कोणी फोन उचलत नाही. लाईट गेल्यानंतर त्यांचा फोन कायमच व्यस्त लागतो. चुकून उचला तर उडाउडवीची उत्तरे तयारच असतात. त्यांना जनतेचे हाल झाल्याच कोणतेच सोयरे सुतक नसते ना देणे घेणे असते. नगर – दौंड महामार्गावर हिवरे झरे येथे महावितरणच्या निष्काळजीपणाची साक्ष देत गेल्या अनेक दिवसांपासून विजेचे खांब अंत्यत दयनीय अवस्थेत उभे आहेत. रोजच पाठीवरील निळ्याभोर आकाशास साक्षी ठेवत महावितरणच्या गेंड्याची कातडी ओढलेल्या अधिकार्‍यांना ठणकावून सांगत आहे की ‘मोडून पडला संसार सारा तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, साहेब लढ फक्त म्हणा’. लवकरात लवकर अधिकार्‍यांना सद्बुद्धी द्यावी आणि हा विद्युत खांब भविष्यात महामार्गावर कोसळून कोणतीही जीवीत किंवा वित्तहानी होऊ नये अशी अपेक्षा ग्रामपातळीवर होत आहे.