घरफोडी करत दागिन्यांसह सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळवला

0
103

नगर – घरफोडी करून सुमारे चार तोळ्याचे सोन्याचे दागिने, सीसीटीव्हीचा डीव्हीआर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील बारदरी शिवारात बुधवारी (दि.१२) रात्री साडेबारा ते पहाटे सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत अमोल माणिक पोटे (वय १९, रा. बारदरी, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोटे यांच्या घरात चोरट्यांनी बुधवारी रात्री साडेबारानंतर प्रवेश केला.

त्यांनी घरातील तीन तोळ्याची सोन्याची चेन, एक तोळ्याचा सोन्याचा सर, अर्धा ग्रॅमच्या कानातील बाळ्या, सीसीटीव्हीचा व्हिडीआर असा ऐवज चोरून नेला आहे. सदरची घटना पहाटे सहा वाजता लक्ष्यात आली. पोटे यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली असता सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सरोदे करत आहेत.