कापड बाजारातील व्यापारी संतप्त, आंदोलनाचा दिला इशारा नगर – कापड बाजारात सर्वत्र पडून राहिलेल्या कचर्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. या समस्येवर व्यापारी महासंघ व कापड बाजार व्यापारी एसोसिएशनकडून अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना करण्यात आलेली नाही. भर दुपारपर्यंत कचरा न उचलल्यामुळे व्यापार्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही न झाल्यास महापालिका आयुतांच्या दालनात कचरा जमा करून त्यांच्या स्वाधीन करतील, असा इशारा व्यापार्यांनी दिला आहे. व्यापारी सकाळी व्यवसायासाठी नवचैतन्याने दुकानात येतात, मात्र लगेचच त्यांना कचर्याचे दर्शन घडते. सर्वत्र पसरलेल्या दुर्गंधीमुळे दुकाने उघडता येत नाहीत, ज्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. येणार्या ग्राहकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. व्यापारी मोठ्या प्रमाणात कर भरतात तसेच महानगरपालिकेचे देखील सर्व कर नियमित भरतात, तरीही त्यांना वारंवार हा त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी (दि.१३) अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने व्यापार्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी व्यापार्यांनी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनास्थळी पाचारण केले घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अक्षरशः सारडा गल्ली या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली होती. यावेळी कळमकर बोराटे यांनी कचरा ठेकेदार असतील तसेच सुपरवायझर यांना धारेवर धरले.
यावेळी सॅनिटरी इन्स्पेटर यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर उद्यापासून या ठिकाणी कचरा राहणार नाही, याची लेखी नोंद त्यांच्याकडून मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारात साचलेले कचर्याचे ढिगारे तर या प्रश्नासंदर्भात घटनास्थळी येवून व्यापार्यांशी चर्चा करताना माजी महापौर अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे घेण्यात आली तसेच पुढील काळात जर या ठिकाणी कचरा राहिला तर आयुक्ताच्या दालनात स्वतः बोराटे व कळमकर हे कचरा टाकतील व शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा बोराटे यांनी दिला आहे. माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि अभिषेक कळमकर यांनी तातडीने हस्तक्षेप करून कचरा उचलण्याची व्यवस्था केली. दुपारी १:३० वाजता कचरा उचलला गेला, पण व्यापार्यांमध्ये असंतोष कायम आहे. व्यापारी किशोर बल्लाळ, रवी गांधी, संजय काठेड, ललित कटारिया, अमित गांधी, धर्मेंद्र सोनग्रा यांनी आपली व्यथा व्यक्त केली. अहिल्यानगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी, जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर व्यापारी मोठे आंदोलन उभारतील आणि कचरा महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात आपापल्या कर्मचार्यांच्या सहायाने कचरा जमा करून त्यांना स्वाधीन करतील, असा इशारा दिला आहे. या वेळी उपस्थित नगरसेवकांनीही व्यापार्यांना पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
गुन्हा दाखल झाला तरी व्यापार्यांसाठी लढा देऊ : अभिषेक कळमकर व बाळासाहेब बोराटेंचा इशारा
शहरातील मुख्य बाजारपेठेत दुपारी १ वाजेपर्यंत कचर्याची ढिगारे पडलेली आहेत. कचरा वाहतूक ठेकेदाराचे बिल थकल्यामुळे ही अवस्था झाल्याचे सांगण्यात येत आहे. ठेकेदाराच्या बिलाची काय व्यवस्था करायची ती महापालिकेने करावी. परंतु या कचर्याचा व्यापारी, ग्राहक यांना होत असलेला त्रास थांबवावा, कमिश्नर असो किंवा आयुत, ही मोठी पदे जरी असली तरी आमच्यासाठी व्यापारी, ग्राहक हेही मोठेच आहेत. त्यामुळे यापुढे कचर्याचा प्रश्न उद्भवल्यास टनभर कचरा आयुतांच्या दालनात आणून टाकू. त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, आम्ही व्यापार्यांसाठीचा लढा सुरुच ठेवू, असा इशारा माजी महापौर अभिषेक कळमकर व माजी नगरसोवक बाळासाहेब बोराटे यांनी दिला आहे.