विकासाच्या गप्पा मारणार्या राजकारण्यांचे बसेसच्या दयनिय अवस्थेकडे दुर्लक्ष
नगर – एसटी महामंडळाच्या बसेसची किती दयनिय अवस्था झाली याचा साक्षात अनुभव घेतला तो जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्यासह बसमध्ये असलेल्या अनेक अनोळखी प्रवाशांनी पुण्याहून नगरमार्गे येत असलेली पुणे-जाफराबाद (एमएच २०, २८६८) ही रांजणगावजवळ आली आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने सुरुवातीची काही मिनिटे प्रवाशी सुखावले. मात्र त्यांना जेव्हा कळले की बसचे छत गळके आहे. त्यानंतर मात्र या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. बसमध्ये बसलेले सुहास मुळे यांनी तर चक्क स्वतःजवळची छत्री उघडून डोयावर धरली. इतर प्रवाशांना मात्र गळया छताखाली भिजावे लागले. या प्रसंगाने मात्र एसटी महामंडळाच्या बसेसची किती दयनिय अवस्था झाली आहे हेच अधोरेखित केले आहे.
त्यामुळे शासनकर्ते किती विकासाच्या गप्पा मारत असले तरी प्रत्यक्ष जमिनीवरील हकीगत वेगळेच काही सांगत आहे. रांजणगावला जेव्हा ही बस आली तेव्हा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होती. त्यामुळे सुमारे एक तासभर एकाच जागेवर बस उभी करण्याची वेळ आली. वाहतूक कोंडी आणि वरून कोसळणारा जोरदार पाऊस अशावेळी प्रवाशांचे काय हाल झाले ते त्यांनाच ठाऊक. मात्र या प्रसंगाचे व्हीडीओ चित्रिकरण करून मुळे यांनी परिवहन मंत्रालय तसेच परिवहन आयुक्तांना ते पाठविले आहेत. याबाबत राजकारणी, सत्ताधार्यांनी थोडी जरी… वाटली तर ते या एसटी बसेसच्या दयनिय अवस्थेकडे लक्ष देऊन सुधारणा करतील, अशी अपेक्षा मुळे यांनी व्यक्त केली आहे.