मोबाईलवर आलेली लिंक केली लिक अन् बँक खात्यातून १ लाख ८० हजार झाले गायब

0
87

नगर – मोबाईलवर व्हाट अप वर एक लिंक आली त्या लिंक मध्ये असलेली कस्टमर सपोर्ट फाइल बघण्यासाठी लिक केले असता ओटीपी न देता क्रेडिट कार्डवरून १ लाख ८० हजार रुपये गायब झाल्याचा प्रकार केडगाव उपनगरात समोर आला आहे. या प्रकरणी अनोळखी सायबर भामट्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत केशव निवृत्ती सानप (रा. रभाजीनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या चार बँकांची क्रेडिट कार्ड आहेत. त्यांच्या मोबाईलवर व्हाट अप नंबरवर कस्टमर सपोर्ट एपीके फाईल आली. ती पाहण्यासाठी त्यांनी लिक केले. त्यानंतर काही क्षणांत त्यांच्या एका बँकेच्या खात्यातून सुरुवातीला ३ हजार रुपये डेबिट झाले. कोणताही ओटीपी न देता ही रक्कम खात्यातून गायब झाली. काही वेळानंतर उर्वरित तीन बँकांच्या खात्यांतून ओटीपी न देता पैसे गायब झाले. एकूण १ लाख ८० हजार रुपये खात्यातून गायब झाले. हा प्रकार सोमवारी (दि.१०) दुपारी झाला. त्यानंतर त्यांनी याबाबत बुधवारी (दि.१२) दुपारी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं. वि.कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.

ओटीपी न देता गायब होतात पैसे

सर्रासपणे बँकेतून बोलतो आहे, असे सांगून ओटीपी मागविला जातो. ओटीपी घेऊन सायबर भामटे पैसे गायब करतात: परंतु, ओटीपी न देताही पैसे गायब झाल्याचा प्रकार समोर आहे. त्यामुळे कोणत्याही लिंकवर लिक करणे महागात पडू शकते. त्यामुळे नागरिकांनी सर्व खातरजमा केल्या शिवाय अशा फसव्या लिंक वर लिक करणे टाळावे असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.