केडगाव – अरणगाव रस्त्यावरील घटना; एकावर चोरीचा गुन्हा दाखल
नगर- घराचे गेट व तार कंपाऊंड तोडून नुकसान करत विविध साहित्याची चोरी केल्याची घटना केडगाव – अरणगाव रस्त्यावर घडली या प्रकरणी एकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश चव्हाण (पूर्ण नाव, रा. अरणगाव ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नेव्हिल कुरूश गांधी (वय २२, रा. मुळ रा. जूहु, मुंबई, हल्ली रा. अरणगाव रस्ता, दुधसागर सोसायटी, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सध्या मुंबई येथे राहतात. त्यांचे केडगाव – अरणगाव रस्त्यावर घर आहे. ते नगर ला घरी आले असता घराच्या बाजूस असलेल्या गेट व तार कंपाऊड तोडून नुकसान केलेले त्यांना दिसले.
पाण्याच्या हौदाचे लोखंडी झाकणाची चोरी करून पाण्याच्या पाईपचे नुकसान केलेले दिसले. तसेच वीज मिटरमध्ये छेडछाड करून एक वायर वीज चोरी करण्याच्या उद्देशाने जोडल्याचे दिसले. सदर वायर कुठे जाते याची त्यांनी पाहणी केली असता टी गणेश चव्हाण यांच्या घराकडे जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर घराच्या गच्चीवर असलेली पाण्याची टाकी चोरून नेली असल्याचे दिसले. त्यामुळे सदर प्रकार हा गणेश चव्हाण याने केल्याचे निदर्शनास आल्यावर गांधी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.