नगर – विद्यार्थ्यांनी डॉटर, इंजिनिअर, वकील अशा पारंपारिकक्षेत्राकडे न वळता कलेच्या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना चांगला वाव आहे. सिनेसृष्टी, टीव्ही सिरीयल अशा कलेच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक व्यक्तींची गरज भासत असते. नाट्यसृष्टीत कथा लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक, संगीतकार, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, एडिटर अशा अनेक कामांसाठी कलेच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान अवगत असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांनी कलेच्या क्षेत्रातील तंत्रज्ञान अवगत करून उज्वल भविष्य करावे. विद्यार्थ्यांनी अकरावीत हिंदसेवा मंडळाच्या सारडा महाविद्यालयात प्रवेश घ्यावा. विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन सारडा महाविद्यालयाचे प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले आहे. हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व गुणपत्रक वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत सारडा महाविद्यालयाचे प्रा.प्रसाद बेडेकर, शाळेचे चेअरमन जगदीश झालानी, प्राचार्य प्रा.अनुरीता झगडे, वर्गशिक्षिका उषा भालेराव, मोहिनी नराल, ऐमन बागवान, सत्यश्री चिलका, गीता वल्लाकट्टी मोनिका बामदळे आदी उपस्थित होते. शाळेत प्रथम क्रमांक – गौरव चंगेडिया (९४.२० टक्के), द्वितीय क्रमांक -श्रुती रिंगणे (९३ टक्के), तृतीय क्रमांक वैष्णवी शिंदे (९०.४०टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. जगदीश झालानी म्हणाले, विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यासाठी शाळेतील शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले आहे. तसेच हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व संचालक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांनी अकरावीत हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयात प्रवेश घ्यावा. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सारडा महाविद्यालयात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. प्रा.अनुरीता झगडे म्हणाल्या, दहावीच्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे. यंदाच्या वर्षी हिंदसेवा मंडळांनी मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये हिंदसेवा पॅटर्न राबविण्यात आल्याने शाळेचा निकाल चांगला लागला आहे. मेहेर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम राखली आहे. हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकार्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन उषा भालेराव यांनी केले. तर आभार मोहिनी नराल यांनी मानले. गुणवंत विद्यार्थ्यांचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अॅड.अनंत फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन अनंत देसाई, भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी, दादा मराठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, कार्य.सदस्य मधुसूदन सारडा, प्रा. ज्योतीताई कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले आहे.