राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने निवेदन
नगर – विशाखापट्टणम महामार्गावर असलेले खंडोबा मंदिर जवळ सार्वजनिक शौचालय उभारू नये, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी युवक अध्यक्ष श्रावण काळे, ओंकार फिरोदे, निलेश तेंडुलकर, आदित्य काटे, पवन नायकू, सोमा हरबा, यश अंबिलवादे, ओमकार हरबा, रोहन नायकू, राजू दहिंहंडे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की नगर पाथर्डी रोडवरील असलेल्या खंडोबा मंदिर जवळील सार्वजनिक शौचालय परत त्याच ठिकाणी न बांधता कॅन्टोन्मेंट शाळे जवळील मोकळ्या जागेत बनवावे. मंदिरा जवळ बांधू नये, यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत आणि या सार्वजनिक शौचालयामुळे वाहतूक कोंडी ही निर्माण होते, दुर्गंधी पसरते या सार्वजनिक शौचालयाचा वापर स्थानिक नागरिक कोणीच करत नाही, याबाबत अनेक नागरिकांनी यापूर्वी देखील निवेदनाद्वारे तक्रार केली परंतु कुठलीही कारवाई केली नाही. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.