सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व सचिन सुसे यांच्या पुढाकाराने ३९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रा. माणिक विधाते, सचिन सुसे, प्रा. अरविंद शिंदे, शिवाजी विधाते, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, मयुर भापकर, लहू कराळे, गणेश बोरुडे, सचिन शिंदे, निलेश इंगळे, संतोष हजारे, माऊली जाधव, कराळे, ऋषी ताठे, योगेश खताळ आदींसह शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्ते.