चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍याला माळीवाडा बसस्थानकात पकडले

0
65

खिशात आढळला मोटारसायकलींच्या ६ चाव्यांचा जुडगा नगर – शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात दूचाकी वाहन चोरण्याच्या किंवा प्रवाशांच्या बॅगा मधून ऐवज चोरी करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या अंधारात संशयितरित्या वावरणार्‍या एकास कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पकडले आहे. त्याच्या खिशात मोटारसायकलींच्या ६ चाव्यांचा जुडगा आढळून आला आहे. प्रशांत रावसाहेब वडांगळे (वय २७, रा. चिपाडे मळा, केडगाव) असे या संशयिताचे नाव आहे. कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानुसार कोतवाली पोलीस शहर हद्दीत रात्रगस्त घालत असताना बुधवारी (दि.१२) पहाटे १ वाजण्याच्या सुमारास माळीवाडा बसस्थानक परिसरात पाठीमागील बाजुस एक जण अंधारात संशयित रित्या वावरताना सेटर नं. २ पेट्रोलिंगचे पो.कॉ. अमोल गाडे अभय कदम यांना दिसला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिस त्या संशयीत इसमांजवळ गेले असता तो तेथुन पळुन जावु लागला. त्यास पो.कॉ.अमोल गाडे यांनी जागीच पकडले. त्याची कसून चौकशी करता त्याचे नाव प्रशांत रावसाहेब वडांगळे असे असल्याचे सांगीतले. त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात १०० रुपये किमतीच्या मोटार सायकलच्या ६ चाव्यांचा जुडगा मिळुन आला. त्याने याबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या प्रकरणी पो. ना. संदीप साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुनत्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.