सलग दुसऱ्या दिवशीही उशिरा येणाऱ्या ४५ कर्मचाऱ्यांना आयुक्तांची शेवटची वॉर्निंग

0
67

कडक कारवाई केली जाणार, ओळखपत्र व युनिफॉर्ममध्ये येण्याची आयुक्त पंकज जावळे यांची सूचना

नगर – अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हे महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावत १ हजार रुपयांचा दंड करूनही दुसर्‍या दिवशी १५५ कर्मचार्‍यांपैकी ४५ कर्मचारी हे कामावर उशिरा आले, यावेळी सर्व कर्मचार्‍यांशी चर्चा करत, आता शेवटची वॉर्निंग असून कारवाईला तयार रहा, असा इशारा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला आहे. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दुसर्‍या दिवशी पुन्हा एकदा अस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांना कर्मचार्‍यांची गेटवर हजेरी घेण्यास सांगितले होते यावेळी कार्यालयीन वेळ होवून गेली तरी देखील ४५ अधिकारी कर्मचारी हे वेळेत हजर झाले नाही. यावेळी आयुक्त यांनी मनपा कार्यालयात उशिरा येणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला तसेच सर्व कर्मचार्‍यांनी ओळखपत्र व युनिफॉर्ममध्ये कामावर यावे अशा सूचना त्यांनी दिल्या.