नगर – ९ जून रोजी वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या गाडीवर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा अहमदनगर येथे निषेध करण्यात आला अहमदनगर शहरातील दिल्ली गेट परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान यावेळी आंदोलकांनी पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवत तो पेटवून देत हे आंदोलन केले. ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राइक करत आतंकवाद्यांना भारत सरकारने उत्तर दिले होते त्याच पद्धतीने भाविकांवर हल्ला करणार्या आतंकवाद्यांना देखील ठेचून काढावे, अशी मागणी बजरंग दलाचे कुणाल भंडारी व आंदोलकांनी केली आहे.