महेश कांबळे यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल ॲवॉर्ड प्रदान

0
84

नगर – येथील फोटोग्राफर महेश कांबळे यांना वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल वर्ल्ड पार्लमेंटचा सर्वोच्च पुरस्कार वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२४ देऊन सन्मानीत करण्यात आले. श्रीरामपूर येथील समारंभात त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या संपादकीय मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलथे, डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ.दत्ता विघावे, हमाल साहित्यीक आनंदा साळवे, एसटी महामंडळाचे नवनाथ गवळी, स्वामीराज कुलथे, सुनिल पाटील, जेष्ठ कवी रज्जाक शेख, राष्ट्रपती पदक विजेत्या मोनिका शिंपी, जेष्ठ कवयत्री मंजुषाताई ढोकचौळे, डॉ.शैलेंद्र भणगे, सी.के भोसले उपस्थित होते.