नगर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी

0
92

जूनच्या सुरुवातीला गतवर्षी पेक्षा यावर्षी बरसला दुप्पटी पेक्षा जास्त पाऊस 

नगर तळकोकण – यावर्षी ओलांडून मान्सूनची वाटचाल पुढे वेगाने सुरू आहे. त्यानंतर रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे ही शहरं काबीज करुन नगर जिल्ह्यातही सर्वदूर मान्सून धडकल्याने शेतकर्यांगमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे आता शेती कामांना वेग येणार आहे. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिंळाला आहे. नगर जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातील मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सरासरीच्या २७.३ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी तो ११.८ टक्के होता. नगर शहरासह जिल्ह्यात या वर्षी मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेष करून कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुयातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यासह नगर, शेवगाव, संगमनेर तालुयातील काही मंडळात वादळी वार्यायसह पाऊस बरसत आहे. नगर शहरात मंगळवारी (दि.११) सकाळी आणि सायंकाळी ही दमदार पावसाला सुरूवात झाली असून रात्री उशीरापर्यंत हा पाऊस सुरू होता.

जिल्ह्यात ७ व ८ जूनला मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. असह्य उष्णतेने अस्वस्थ झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास सुरूवात झाली आहे. दुसरीकडे खरीपच्या पेरण्यासाठी शेतकर्यांकची लगबग सुरू झाली असून कपाशी लागवडीसाठी शेत तयार करण्यात शेतकरी व्यस्त दिसत आहे. दक्षिण जिल्ह्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र अधिक असून झालेल्या पावसामुळे कडधान्य पिकांच्या पेरणीला सुरूवात होणार आहे. कृषी विभागाच्यावतीने पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांना सुरूवात न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात अनेक महसूल मंडळात मोठ्या पावसाची प्रतिक्षा असल्याने पुढील काही दिवसात पाऊस झाल्यानंतर सर्वदूर पेरण्यांना सुरूवात होणार आहे.

नगर जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस

बुधवारी (दि.१२) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस व कंसात जून महिन्यातील पाऊस पुढील प्रमाणे – नगर – १५.९ मिमी (१३०.५ मिमी), पारनेर – ९.७ मिमी (१०७.६ मिमी), श्रीगोंदा – १३ मिमी (१८३ मिमी), कर्जत – २७.१ मिमी (२०२.३ मिमी), जामखेड ४.३ मिमी (१४१.२ मिमी), शेवगाव – ५.१ मिमी (१०८.२ मिमी ), पाथर्डी – ११.३ मिमी (१७२.५ मिमी), नेवासा ४.४ मिमी (१०४.३ मिमी), राहुरी – ४.६ मिमी (८७.४ मिमी), संगमनेर – १३.८ मिमी (६७.१ मिमी), अकोले – ३.३ मिमी (५९.२ मिमी), कोपरगाव – ११.५ मिमी (८०.५ मिमी), श्रीरामपूर – २ मिमी (८७.९ मिमी), राहाता – ० (९२.६ मिमी), एकूण सरासरी ९.६ मिमी (११५.२ मिमी).