नागरिकांच्या तक्रारीचे महावितरणने तातडीने निराकरण करावे : मनोज कोतकर
नगर – पावसाळा सुरू झाला असून एमएसईबीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे केडगावमध्ये गेल्या पाच दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे एम एस ई बी च्या विरोधात नागरिकांचा रोष वाढत चालला आहे, रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होऊन रात्रभर वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही नागरिकांनी केलेले फोन उचलले जात नाही, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण होत नाही तरी नागरिकांचे फोन उचलून तातडीने तक्रारीचे निराकरण करावे ताराबाग कॉलनी, हनुमान नगर, देवीरोड, दूध सागर सोसायटी, मोहिनी नगर, व केडगाव परिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे, काही ठिकाणी पोलवरील तारा लोंबकळल्या असून त्यांची दुरुस्ती तातडीने करावी अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शयता नाकारता येत नाही तरी एम एस ई बी ने नागरिकांचे विजेचे प्रश्न तातडीने सोडावेत अशी मागणी केडगाव विभागाचे अधिकारी दत्तात्रेय दसपुते यांच्याकडे स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केली आहे.