‘मी पुन्हा येईन’ या तीन शब्दांमुळे ५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारणाची ‘माती’ झाली

0
81

‘युती तिथं माती होतेच’ त्यामुळे स्वळाचा नारा हाच भारतीय जनता पार्टीसाठी ‘रामबाण’ उपाय; चाणय हा चाणाक्ष असावा

नगर – लोकसभेचे निवडणूक पर्व संपले. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चर्वित चवर्ण सुरु झाले. वरातीमागून घोडे नाचू लागले. राज्य पातळीवर नेत्यांचे सुध्दा धावू लागले. पराभव झाल्यानंतर पक्ष प्रवत्यांनी जपून बोलावे अशी उपरती झाली. बैल गेला नि झोपा केला. वेळीच वेसण घातली असती तर ही वेळ आलीच नसती. चाणय हा केवळ चाणय असून भागत नाही, तर तो चाणाक्ष असावा लागतो. ’मी पुन्हा येईन’ या तीन शब्दांमुळे गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाची माती झाली. कधी नैसर्गिक तर कधी अनैसर्गिक, तर कधी हिंदुत्वाच्या मोहाचे गोंडस नाव देवून सत्तेच्या मोहाचा छुपा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न झाला. मोठा भाऊ – छोटा भाऊ या नावाखाली घराघरातून भाऊबंदकी पेरली गेली. त्यामुळे प्रत्येक पक्षातला निष्ठावंत कार्यकर्ता संपला आणि आपल्याच नेत्याचा फक्त निष्ठावंत नेता निर्माण झाला ही महाराष्ट्राच्या राजकारणाची शोकांतिका ठरली, अशी प्रतिक्रिया शहर भाजपचे अनिल गट्टाणी यांनी दिली आहे.

युतीपासून होणारी माती थांबविली पाहिजे

अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार महायुतीच्या हातून निसटले आणि पक्ष संघटनेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गेल्या २-३ टर्ममध्ये भाजपचा उमेदवार लिलया निवडून येत होता पण जुन्या-जाणत्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला केल्यामुळे उमेदवाराचे पानिपत झाले. स्वबळाचा नारा हवेत विरून गेला. त्यामुळे पक्ष संघटन व कार्यकर्त्यांची बांधणी याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. सत्तेच्या मोहाला आवर घालून युती पासून होणारी माती थांबवली पाहिजे. हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सूर आहे. केवळ आरोप-प्रत्यारोप करुन भागणार नाही. आपल्या चुकांचा शोध घ्यावा लागणार. ’आत्मेव ह्यात्मनो बंधु | झालैव रिपुरालनः |’ अर्थात आपणच आपले बंधु असतो आणि आपणच आपले शत्रु असतो. या निवडणुकीत युती करुन आपणच आपले शत्रु झालो, हे भाजपासारख्या मोठ्या पक्षाने लक्षात घेतले पाहिजे.

पुन्हा येवू पाहणार्‍या महत्वाकांक्षेमुळे साराच विचका

सर्वांसाठी दरवाजे खुले हा वृथा अभिमान अंगलट आला. दुसर्‍याच्या ताटातील अन्न घेऊन आपल पोट भरत नसतं, तर कधी-कधी अजीर्ण होऊन नुसतेच ढेकर येत असतात. तशी अवस्था भाजपाची झाली आहे. स्वबळावर निवडणूक लढवली असती, उमेदवार कमी निवडून आले असते तरीही समाधानाचा स्वावलंबी ढेकर देता आला असता. परंतु दुर्दैवाने पुन्हा येवू पाहणार्‍या महत्त्वाकांक्षेमुळे साराच विचका झाला. त्यामुळे पुन्हा येईन म्हणणारे तर आले नाहीच पण इतरांनाही आपल्या बरोबर घेऊन गेले. या जिल्ह्यात नगर जिल्हा रा. स्व. संघ यांची उदासिनता लपून राहिली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील हीच परिस्थिती आहे. तडजोडीच्या राजकारणाने मोठ्या पक्षाची माती होत आहे. जनसामान्यांना तडजोडीचे राजकारण मान्य नाही. सामान्य जनता स्वतःच्या जटील प्रश्नात गुरफुटल्यामुळे प्रस्थापितांना धक्का देण्याच्या मनस्थितीत आहे. तेंव्हा आता अशा प्रस्थापितांसाठी पक्षाचे दरवाजे बंद करा आणि सामान्यांसाठी खुली ठेवा त्यामुळे स्वबळावर लढणे शय होईल. दोन खासदारावरुन तीनशे दोन खासदार झालेले आहेत हा पूर्वइतिहास लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा स्वबळाचा अजेंडा राबवा, यश तुमचेच आहे.

मनोमिलनाची जागा मनीमिलनाने घेतल्याचे संघटनेच्या लक्षात आले नाही

धनशक्ती, जनशक्ती या शब्दजंजाळात अडकल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनःशक्तीकडे दुर्लक्ष झाले. मनोमीलनाची जागा मनीमीलनाने केव्हाच घेतली, हे पक्ष संघटनेच्या लक्षात आले नाही. त्यामुळे प्रचार अंतरंगी न होता वरपांगी झाला. व्यक्तीकेंद्रीत संघटना न होता ती निष्ठावान कार्यकर्ता केंद्रीत होणे आवश्यक आहे. एके काळी घरोघरी पोळ्या गोळा करुन संघटना व कार्यकर्ता यांच्यामध्ये मजबूत धागा विणला जात होता. दुर्दैवाने पोळ्याची जागा आता टाळ्यांनी घेतली आणि टाळी वाजवणार्‍या कंपूचे महत्त्व वाढले. कंपू शाहीमुळे पक्षाची घसरण होते, हे पक्ष श्रेष्ठींच्या वेळीच लक्षात यायला पाहिजे. अयोग्य तडजोडी बंद करुन खोगीर भरती थांबवली पाहिजे. अन्यथा श्रध्दा, सबुरीच्या भूमीतही पराभव पदरी येतो. विरोधकांचा विरोधी सूर असतोच पण त्यांच्याही चांगल्या गोष्टी स्विकाराव्यात. ’उत्कट भव्य तेचि घ्यावे’ हा दृष्टीकोन विरोधकांच्या म्हणण्याचा घ्यावा. पक्षसमृध्द, सक्षम व स्वावलंबी होण्यासाठी ’स्वबळाचा नारा’ हा एकमेव सध्यातरी रामबाण उपाय आहे, असे गट्टाणी यांनी म्हटले आहे.