मुंबई – लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात प्रचंड घसरणी झाली मात्र मागील दोन्ही सत्रात मार्केटमध्ये रिकव्हरी दिसून येत आहे. बुधवार (दि.५) ची तेजी काय ठेवत गुरुवारी (दि.६) सलग दुसर्या दिवशी देशांतर्गत बाजारात सुरुवातीला चांगली रिकव्हरी झाली. मंगळवारी निवडणूक निकालाच्या दिवशीच्या त्सुनामीनंतर बुधवारी शेअर बाजारात वादळी तेजी नोंदवली गेली असून निकालाच्या दिवशी सेन्सेस आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमधील पडझडीत झपाट्याने सुधारणा दिसून आली. मार्केटमधील तेजीची हिरवळ गुरुवारीही कायम राहिली आणि सुरुवातीच्या सत्रात बॉम्बे स्टॉक एसचेंजचा सेन्सेस ४०० अंकांच्या मजबूत वाढीसह उघडला तर निफ्टीनेही १५० अंकांच्या तेजीसह ओपनिंग केली. सकाळी प्री-ओपन सत्रात हिरव्या चिन्हात व्यापार सुरू झाला आणि बीएसई सेन्सेस ४०६.४८ अंकांनी वाढून ७४,७८८.७२ अंकांवर उघडला तर एनएसई निफ्टीही १५० अंकांच्या वाढीसह २२,७९८ वर ओपन झाला.
सेन्सेसने बुधवारची घसरणी दुसर्या दिवशी सकाळीही सुरू ठेवली. निर्देशांकात समाविष्ट आठ शेअर्समध्ये घसरण होताना दिसून आली तर २२ समभाग वधारले. एनटीपीसी स्टॉकमध्ये सर्वाधिक तेजी नोंदवली गेली आणि सुरुवातीच्या सत्रात ३.७२ टक्के उसळीसह ३५३.६५ रुपयांवर पोहोचले. याशिवाय एसबीआय शेअर २.६७ टक्क्यांच्या वाढीसह ट्रेडिंग करत असून टेक महिंद्रा शेअर २.३५ टक्के, पॉवरग्रीड २.०३ टक्के वधारून ट्रेंड करत आहे. त्याचवेळी, मिडकॅप कंपन्यांमध्ये बी एच ई एल शेअर ८.५४ टक्के, एन एच पी सी शेअर ६.२७ टक्के, पी एफ सी शेअर ६.१० टक्के , आर इ सी लिमिटेड ५.६४ टक्के, आय ओ बी ४.४९ टक्के, एस जे व्ही एन ४.२४ टक्क्यांची झेप घेऊन व्यवहार करत आहे.