शहरातही लाईटचे दिवे अखंडपणे सुरुच; आयुक्तांना कल्पना दिल्यानंतर कार्यवाही

0
54

नगर – स्टेशन रोड आगरकर मळा या भागातले स्ट्रिट लाईट अखंडपणे गेल्या दोन दिवसापासून दिवस-रात्र चालू आहेत, मतदानाच्या दोन दिवस अगोदर मात्र उलटी परिस्थिती होती, त्यावेळेस आम्हाला आंदोलन करावे लागले की हे दोन्ही दिवस हा परिसर अंधारात बुडाला होता, कदाचित तो अंधार जाणून-बुजूनही केलेला असावा, अशी येथील नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे कारण जागोजागी कोपर्‍या कोपर्‍यामध्ये मतदानापूर्वीचे पैसे वाटपाचे काम अंधारात येथील आदर्श नगरच्या आदर्श सेवकांकडून सोयीस्कर चालू होते आणि आज मात्र मागील दोन दिवसापासून अखंडपणे हे स्ट्रिट लाईट दिवस रात्र चालू आहेत, कदाचित निवडणुकीत काय दिवे लागले गेले हे प्रशासनाला दाखवायचे असेल. दोन दिवस वाट पाहून अखेर आयुक्त यांना फोन करुन याची कल्पना दिली असल्याची माहिती जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी केली आहे.