माजी सैनिक संघटना व मतीन सय्यद यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव
नगर – सय्यद मतीन ख्वाजा यांनी २४ मे रोजी सदरील वाडियापार्क येथील जलतरण तलाव येथे भेट दिली असता त्यावेळेस तेथे सुरक्षारक्षक दिसून आले नाही. वॉचमन आणि इतर मुले दिसली त्यांना योग्य ते ट्रेनिंग देण्यात आलेले नव्हते तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचा जलतरण तलावाचे ज्ञान नव्हते त्यामुळे २४ मे रोजी सदरील घटनेचे गांभीरपणे विचार करून जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदनाद्वारे सूचित केले होते की वाडिया पार्क जलतरण तलावामध्ये कुठलाही सुरक्षारक्षक नसल्याने जीवित हानीची मोठी घटना होऊ शकते अशी तक्रार केली असता सर्रासपणे नियमाचे उल्लंघन होत आहे. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत पोहण्यासाठी व शिकण्यासाठी लोक येतात त्यांना (सर्टिफाइड लाईफ गार्ड ट्रेनर) तांत्रिक मनुष्यबळ नियमानुसार नेमण्यात यावे असे निवेदन दिले होते परंतु २ जून रोजी सकाळी वाडिया पार्क जलतरण तलाव येथे सागर कळसकर नावाचे व्यक्तीचा पोहताना मृत्यू झाला ही बाब कळाली असता जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार यांच्या गैरप्रकाराचे व गांभीर्याने लक्ष न देण्याच्या कारणामुळे घटना झालेली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार यांनी निवेदनाची दखल घेतली नाही जलतरणमध्ये कोणत्याही प्रकारचे लक्ष न दिल्याने व त्यांनी जाणून बुजून कामात कसूर केल्याने निष्काळजीपणामुळे सदरचा घटना घडलेली आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सय्यद मतीन ख्वाजा, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अथर खान, माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष नवनाथ मोहिते, बेलदार समाजाचे जिल्हा अध्यक्ष रघुनाथ मोहिते आदी उपस्थित होते. या निवेदनाची दखल न घेतल्यास त्रिदल माजी सैनिक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा देखील देण्यात आला आहे.