सामाजिक जाणिवेतून सुरु केलेल्या अन्नछत्रास नगरमधील दातृत्वांची मदत : नाना भोरे

0
44

नगर – सामाजिक क्षेत्रात वावरताना आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो ही भावना ठेवून केलेले कार्य कायम स्मरणात राहते. आपल्याजवळ मुठभर असले तरी चिमुटभर देण्याची भावना मनात ठेवली तर ओंजळभर मिळाल्याशिवाय राहत नाही. सावेडी, नगर मधील लोकांसाठी सामाजिक जाणिवेतून सुरु केलेल्या अन्नछत्रास नगरमधील दातृत्वाची मोठी मदत मिळते, त्यामुळेच हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपने सुरु केलेले भोजनालय सेवा म्हणून आजही सुरु आहे, असे प्रतिपादन नाना भोरे यांनी केले. स्नेह ७५ चा १९ वा वर्धापन दिन सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या अन्नछत्राच्या माध्यमातून सर्वांची भुख भागविणार्या हेल्पिंग हॅण्डस् फॉर हंगर्स ग्रुपचा सन्मान व पर्यावरण रक्षण करणार्या हरियाली संस्थेचे सुरेश खामकर यांचा सत्कार स्नेह ७५ च्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब रेणाविकर, मिलिंद भारदे, रजनी ढोरजे, डॉ.प्रविण रानडे, गुलाब गोरे, डॉ.विनोद सोळंकी आदि उपस्थित होते.

स्नेह ७५ चा वर्धापन दिन साजरा

नाना भोरे पुढे म्हणाले, समाजसेवा ही ईश्वरसेवा समजून २८ मे २०१९ रोजी भोजनगृहाच्या माध्यमातून २० रुपयांमध्ये राईसप्लेट देऊन अन्नदानाचे काम करीत असतांना कोविड काळात अजून सेवा करण्याची संधी मिळाली. ३ ते ३५०० हजार टिफिन रोज मोफत पुरविले, कोकणतील पुर परिस्थितीत ट्रक भरुन अन्न-धान्य नेले. त्यावेळी २०० लोकांना रोज २ वेळेला जेवण पुरविणे. यासाठी नगरमधील असंख्य दातृत्वानी मदत केली. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांची असते. हरियाली संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करुन असंख्य झाडांची देखभाल करीत केलेला पर्यावरण दिन साजरा न करता वर्षभर पर्यावरण समतोल ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सुरेश खामकर यांनी सांगितले. प्रास्तविक बाळासाहेब रेणाविकर यांनी कले तर गुलाब गोरे यांनी आभार मानले.