नगर – शहरातील रस्ते एकमेकाला जोडून वाहतुकीचा मार्ग निर्माण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करून घेतला आहे, सी एस आर डी कॉलेज एमएसईबी कार्यालय ते कानडे मळा ते सोलापूर महामार्गाला जोडणार्या रस्त्याचे काम सुरू झाले, बहुतांश रस्त्याचे काम देखील पूर्ण झाले,
सीएसआरडी कॉलेज एमएसईबी कार्यालय ते कानडे मळा रस्त्याच्या कामाला सुरुवात : आमदार संग्राम जगताप
मात्र एमएसईबी विभागाच्या प्रलंबित कामामुळे कार्यालयासमोरील काम बंद पडले होते, मधल्या काळामध्ये दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामुळे शटडाऊन घेता येत नव्हते आता विद्युत तारा व डीपी स्थलांतरितचे काम सुरू झाले आहे.
त्यामुळे या डीपी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे, कुठलेही विकास कामे करीत असताना अडचणी निर्माण होत असतात. त्या सोडवत शहर विकासाची कामे पूर्ण करावी लागतात कानडे मळ्याजवळील भिंगार नाल्यावर आरसीसी पुलाचे काम देखील मार्गी लागणार आहे, लवकरच सीएसआरडी कॉलेज ते कानडे मळा सोलापूर महामार्गाला जोडणार्या डीपी रस्त्याचे काम पूर्ण होऊन नगरकरांना नवीन वाहतुकीसाठी मार्ग उपलब्ध होणार आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.