हिंदू धर्मातील देवी देवतांच्या मूर्तीसाठी ‘पीओपी’च्या वापरावरील बंदी हटवावी

0
65
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 44;

 

जिल्हा गणेश मूर्तीकार संघटनेचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन, आयुक्तांशी चर्चा

नगर – गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असून, अनेक गणेश मूर्ती कारखानदारांनी लाखो रुपये खर्च करून गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. येथे तयार झालेल्या मूर्ती राज्यासह संपूर्ण भारतात व विदेशात प्रसिद्ध असून, विक्री केल्या जातात. सद्य परिस्थितीत गणेश मूर्ती कारखान्यात बनवून तयार आहेत. अनेक मूर्तींचे बुकिंग झाले आहे. मनपाने दिलेल्या नोटीसीप्रमाणे गणेशमूर्ती कारखानदार प्रशासनास सहकार्य करण्यास तयार आहेत. परंतु विविध राज्यांतील न्यायालयांत पीओपीच्या मूर्तींबाबत विविध खटले होऊन त्यात पीओपी पर्यावरणाला हानिकारक असल्याचे कुठेही नमूद नाही. याबाबत अधिकृत शास्त्रज्ञांनी कोणतेही मत नोंदवलेले नाही.

तरीही महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाकडून पीओपीला संपूर्णतः विरोध न करता हिंदू धर्मातील देवी-देवतांच्या विशेष करून गणेश मूर्तीला विरोध करण्याचा हेतू असल्याचे निदर्शनास येत आहे. नगर जिल्हा गणेश मूर्तीकार संघटनेच्या वतीने गणेशमूर्ती बनविण्यासाठी लादण्यात आलेली पीओपी वापरावरील बंदी हटवावी, या मागणीचे निवेदन भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांच्या मध्यस्थीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर, उपाध्यक्ष सुशील देशमुख, सचिव संतोष रायपेल्ली, शहराध्यक्ष संदीप सुरसे, भगवान जगताप, प्रफुल्ल पटेल, किशोर रोकडे, चंद्रकांत जोर्वेकर, केतन सोनवणे, प्रफुल्ल लाटणे यांच्यासह शहर व तालुयांतील गणेश मूर्तीकार उपस्थित होते. यावेळी पीओपी बंदीच्या आलेल्या नोटिसा व उपायुक्तांंनी कारखान्यात येऊन केलेल्या पाहणीसंदर्भात पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली. त्यांनी तत्काळ आयुक्तांना फोन करून गणपती कारखानदारावर कोणतीही कारवाई न करण्याच्या सूचना केल्या मूर्तीकरांना आपले काम चालू ठेवण्यास सांगितले. कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी २७ जुलै २०२३ रोजी विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार पीओपी मूर्ती उत्पादन व विक्रीवर कुठल्याही प्रकारची बंदी नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

घराचे सुशोभीकरण, जलशुद्धीकरण, पक्ष्यांचे खाद्य, कॅल्शियम ब्लॉक यामध्ये वैद्यकीय उपयोगासाठी, रस्ते बांधणीमध्ये सर्रास वापर केला जातो. पीओपी सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोणतेही प्रदूषण वा रोगराई पसरत नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचा अहवाल शास्त्रज्ञांनी सरकार व न्यायालयात वेळोवेळी सादर केला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने पीओपीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचे मान्य केले आहे. तरी शासनाने पीओपीवरील बंदी रद्द करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपाचे कार्यकारणी सदस्य वसंत लोढा, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्त पंकज जावळे यांच्याशी चर्चा केली असता, मूर्तिकार संघटनेनेही प्रशासनाला सहकार्य करावे, आयुक्त पंकज जावळे यांनी सांगितले. यावेळी वसंत लोढा म्हणाले की, नगर शहर व जिल्ह्यात गणपती कारखानदार मोठ्या प्रमाणावर असून, त्यांचा उदरनिर्वाह कारखान्यावर चालतो. ही कारखानदारी बंद पडू नये, यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा केली असून, त्याला यश आल्याचे ते म्हणाले.