पहिलवान सोमा बोरुडे याने पटकाविली भातोडी पारगावला कुस्तीत चांदीची गदा

0
45
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 47;

कुस्ती मैदानात जिल्ह्यातील मल्लांची हजेरी

नगर – भातोडी पारगावच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात शहरातील मल्ल पै. सोमा सुभाष बोरुडे यांनी मानाच्या कुस्तीत चांदीची गदा पटकावली. बोरुडे यांची कुस्ती ससेवाडी येथील मल्ल पै. गौरव जरे यांच्यात अटीतटीची झाली. यामध्ये बोरुडे याने कुस्ती चितपट करुन मानाची चांदीची गदा मिळवली. पै. सोमा सुभाष बोरुडे याने कुस्तीत चांदीची गदा पटकाविल्याबद्दल नालेगाव येथे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पै. अशोक घोडके, नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सचिव पै. बाळू भापकर, मिलिंद जपे, काका शेळके, सचिन लांडगे, सुदामा बोरुडे, सागर बेरड आदी उपस्थित होते. भातोडी पारगावच्या यात्रेनिमित्त लाल मातीच्या आखाड्यात थरारक कुस्त्या रंगल्या होत्या. यावेळी जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला. उत्साहपूर्ण वातावरणात युवा मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या.