बालवयातच मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी : जगदीश झालानी

0
49

मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये ढोल ताशा व तुतारीच्या गजरात नवागतांचे स्वागत

नगर – मुलांनी शाळेत आल्यानंतर आनंदी वातावरणात शिक्षण घ्यावे. यासाठी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शाळेतील शिक्षक प्रयत्न करीत असतात. मुलांना शाळेचा कंटाळा येऊ नये. यासाठी मुलांना विविध खेळ, संगीत, नृत्य, गोष्टींची पुस्तके आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बालवयातच मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी, असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी यांनी केले आहे. हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत ढोल, ताशाच्या व तुतारीच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रवेशद्वारासमोर आकर्षक फुग्यांची कमान करण्यात आली होती. शाळेतील शिक्षिका राजश्री बिडकर यांनी मिकी माऊसचा वेष परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधले. दादा चौधरी विद्यालय, पटवर्धन चौक येथून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.

मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारा जवळ आल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला औक्षण करून फुलांची उधळण केली. याप्रसंगी मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी, प्राचार्या प्रा.अनुरीता झगडे, दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले, दीपक शिंदे, संतोष भंडारी, मनोज हिरणवाळे, सत्यश्री चिलका, मोहिनी नराल, आशा घोरपडे, राजश्री बिडकर, दळवी पूनम, सुनिता भोपाळे, आयमन बागवान आदी उपस्थित होते. प्रा.अनुरीता झगडे म्हणाले, मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी हसत खेळत शिक्षण घ्यावे. यासाठी वर्षभर विविध उपक्रम सण,उत्सव साजरे केले जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे. यासाठी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर ही घेतले जाते. तसेच प्राणायाम विविध व्यायामाच्या प्रकारे शिकवले जातात.