माळीवाडा बसस्थानकाजवळ खंडणी गोळा करणार्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी
नगर – शहरातील माळीवाडा बसस्थानकालगतच्या रिक्षा स्टॉपवर रिक्षा लावण्यासाठी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक रिक्षाचालकांकडून २ हजार रुपये महिन्याप्रमाणे खंडणी वसूल करत आहेत. खंडणी न देणार्या रिक्षाचालकांना या गुन्हेगारांकडून मारहाण केली जात आहे. यासंदर्भात संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून मोक्का अंतर्गत कारवाई करून कडक शासन करावे, अशी मागणी रिक्षाचालकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, माळीवाडा बसस्थानकालगत असलेल्या रिक्षा स्टॉपवर शहर व उपनगरातून व्यवसाय करण्यासाठी अनेक रिक्षाचालक येतात, पण त्यांना त्या स्टॉपवर रिक्षा लावण्यासाठी तेथील काही रिक्षाचालक व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक २ हजार रुपये महिना खंडणी मागतात. खंडणी न देणार्या रिक्षाचालकांना मारहाण केली जाते. यासंदर्भात काही लोकांवर कोतवाली पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल झालेले आहेत. मारहाण होऊनही काही रिक्षाचालकांनी पोलिसांकडे तक्रारी केलेल्या नाहीत. ज्यांनी गुन्हे दाखल केले त्यांना धमया देऊन गुन्हे मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. रिक्षाचालकांना मारहाण, दमदाटी करून खंडणी वसुलीचा प्रकार सुरू आहे. अशा खंडणीखोर लोकांना कडक शासन करून त्यांना तुरुंगाचा रस्ता दाखवावा व प्रामाणिकपणे व्यवसाय करणार्या शहरातील रिक्षाचालकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर गणेश आटोळे, बाळासाहेब बेल्हेकर, दिलीप गायकवाड, दिपक गहिले, किशोर कुलट, शंकर आटोळे, राहुल अनभुले, गौरव वामन, राहुल बाचकर, गणेश ढोणे, वैष्णव हरबा, चंद्रकांत वामन, रविंद्र वाघ, नितीन जाधव, शिवम उपाध्याय, संतोष दुसुंगे, निलेश आरोळे, प्रविण उजागरे, राजू पवार, रितेश लसगरे, सुनिल तुरे, गणेश गांगर्डे, योगेश कोकणे, हेमंत कोकणे, किरण कोकणे, सोमनाथ शिंदे, महेश लटके, विशाल पंडागळे, संदीप बहिरवाडे, अशोक सुरवसे, मंजाबापू थोरवे, भाऊ रंधवे, बाबू मोमिन, गणेश केदारी, राजू पासकंटी, सचिन धाडगे, संजय साकुरे, आकाश चव्हाण, नसीर पठाण, अनिल जेऊघाले, कल्पेश गायकवाड, तुषार साळवे, राहुल चौधरी, रविंद्र कर्डक, गणेश देठे, ऋषीजीत गायकवाड, शेख मतीन, शेख समीर, अभिजीत हरेल, विकास प्रजापती, आशिष ताडला, शहादेव बडे, नामदेव जावळे, सचिन जरे, बी. जी. पुंड, विकी साळवे, गणेश खाडे, दत्ता घटी, मुसला धनगर, प्रशांत साळवे, सुनिल बोरा, शेख अन्वर, अंकुश खेडकर, अविनाश दिंडे, महेश सूर्यवंशी, शिवा सुरवसे, ईश्वर खरात, विजय जवेरी, अक्षय सोनवणे, महेश आडागळे आदींच्या सह्या आहेत.