नगर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करावा

0
63

ड्रेनेजलाईन सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष घालावे; माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

नगर – शहरातील काही भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण झाली आहे. याचबरोबर अर्बन बँक कॉलनी, झेडपी या भागातील ड्रेनेजचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वत्र पाणी वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत प्रश्न तातडणे सोडविले गेले पाहिजे यासाठी डॉ. पंकज जावळे यांनी तातडीने लक्ष घालून प्रभाग क्रमांक १५ काटवन खंडोबा, गाझीनगर, आनंदनगर, काळे कॉलनी, पंचशील वाडी मधील नागरिकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडावे, अशी मागणी दत्ता जाधव, दीपक खैरे, प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.