सोने ७२ हजार तर चांदी ८२ हजारांवर

0
28

नवी दिल्ली – सोन्याय्चांदीच्या दरात वाढ झाली असून, सोन्याने प्रथमच ७२ हजारांचा आकडा पार केला आहे. १० एप्रिल रोजीही सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आणि सोन्याचा भाव ७२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे गेला आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव ८२ हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७२,०४८ रुपये तर चांदीची प्रति किलो किंमत ८२,४६८ रुपयांवर पोहोचली आहे. इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार, मंगळवारी संध्याकाळी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ७१,८३२ रुपये प्रति १० ग्रॅम होता जो बुधवारी सकाळी ७२,०४८ रुपयांवर गेला आहे.