आयुर्वेद चौकात तलवारीसह एकाला पोलिसांनी पकडले

0
35

नगर – शहरातील आयुर्वेद कॉलेज चौकात काटवन खंडोबा कडे जाणार्‍या रोडवर कमानी जवळ धारदार तलवार घेवून उभ्या असलेल्या एका तरुणाला कोतवाली पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि.४) पहाटे १ वाजेच्या सुमारास पकडले आहे. आदित्य लहू सकट (वय २३, रा. म्युनिसिपल कॉलनी, नालेगाव) असे त्याचे नाव असून त्याच्या कडून एका धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. आयुर्वेद कॉलेज चौकात काटवन खंडोबा कडे जाणार्‍या रोडवर कमानी जवळ एक जण तलवार घेवून उभा असल्याची माहिती कोतवालीचे पो.नि.प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाच्या स.पो.नि. योगिता कोकाटे व अंमलदारांना कारवाई साठी पाठविले. सदर पथक तेथे गेले असता त्यांना एक संशयित इसम दिसला. त्यांनी त्यास पकडले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक धारदार तलवार मिळून आली. या प्रकरणी पो. कॉ. प्रमोद लहारे यांच्या फिर्यादी वरून कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपी आदित्य सकट याच्या विरुद्ध शस्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.